रोहित पवारांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण ; फडणवीसांना लगावला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरुन भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंची पाठराखण केली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत काही प्रतिप्रश्न विचारले आहेत.

राज्यात कोरोना महामारीमुळे परिस्थिती वाईट असताना राज्य सरकार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, की बदल्यांमध्ये आम्ही बिझी आहोत असे ते बोलतायत, मग आम्हीही म्हणतो की, राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात? त्यांना राजकीय स्टेटमेंट करण्याची सवय आहे. कोल्हापुरात पूर असताना कर्नाटकची चूक झाली होती, तसं त्यांनी कबूल केलंय. आता पूर्व विदर्भातील पुराबाबत एमपी सरकारने विश्वासात घेतले नसल्याचे दिसतंय, असेही पवार म्हणाले.

मोदी तरी कुठे बाहेर फिरतात –

मुख्यमंत्री बाहेर नाहीत अस विरोधक म्हणतायत मग पंतप्रधान कुठं आहेत? ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना? जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत जे झालं ते वाईट झालं, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जे झालं ते चुकीचं झालं. यात शहानिशा करण्याची गरज आहे व त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment