सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असा दावा करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे, असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का?, असा प्रश्न शरद पवार यांना केला असता यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही. त्यांचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये आहे, पार्लमेंटमध्ये आहे. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचा पुरस्कार देखील मिळाला आहे अस शरद पवार यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर, शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपविले पाहिजेत, अशी अनेकदा चर्चा होते. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले,” राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा संच मोठा आहे. या सगळ्यातून मान्य असेल असे अनेक लोक राष्ट्रवादीमध्ये मी सांगू शकतो. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशा नावांची मालिका मी घेऊ शकतो. आज या पक्षामध्ये असे अनेक लोक नेतृत्व करण्याच्या कुवतीचे आहेत.”  असे शरद पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment