म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा होतायत ट्विटरवर ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यातील भारत-चीन दरम्यानच्या संघर्षानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने भारत चीन सीमेवर काय सुरु आहे हे जनतेला सरकारने स्पष्टपणे सांगावे अशी मागणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतामध्ये घुसखोरी केलेली नाही असं वक्तव्य केलं. यानंतर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींनी जपून वक्तव्य करावीत असा सल्ला दिला. मात्र मनमोहन सिंग यांच्या या सल्ल्यावर २२ जून रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र, टीका करण्याच्या नादात नड्डा यांनी आकडेवारी सांगतांना मोठी गफलत केल्यानं त्यांची ट्विटवर फजिती झाली आहे.

जे. पी. नड्डा यांनी ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधतांना म्हटलं होत “४३ हजार किमी भारतीय भूमी चीनला बहाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचेच डॉ. मनमोहन सिंग हे नेते आहेत. यूपीएच्या काळात कोणतंही युद्ध न होता आपला भूभाग गमावला. सातत्यानं आपल्या सैन्य दलांचा अपमान केला गेला,” असं नड्डा म्हणाले होते. आता तुम्ही म्हणाल ट्विटमध्ये काय चूक केली. तर ती चूक अशी कि, नड्डा यांच्या या ट्विटमधील ४३ हजार किमी हे अंतर पृथ्वीच्या एकूण परिघापेक्षा तीन हजार किमी जास्त आहे. पृथ्वीच्या एकूण परिघ ४०,०७५ किमी इतका आहे आणि नड्डा सांगत आहेत कि, ४३ हजार किमी भारतीय भूमी काँग्रेस पक्षाचे डॉ. मनमोहन सिंग यांनी चीनला बहाल केली. या गणितीय चुकीमुळं नेटकऱ्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment