मुख्यमंत्री महोदय, “गुंडाराज” कधी संपणार? – प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आल्या नंतर राज्यातील कायदा व्यवस्था आणि महिलांवरील अत्याचारावरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महोदय, “गुंडाराज” कधी संपणार? असा संतप्त सवाल दरेकर यांनी विचारला आहे.

“कुणीही यावं, महिलांची अब्रु लुटावी, डोळे फोडून टाकावेत, बालिकांवर अत्याचार करावेत, हे कायद्याचं राज्य आहे का ? आघाडी सरकारने महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था “भगवान भरोसे” सोडलीय का ? नगरची रेखा जरेंची हत्या याच प्रकारातली आहे. या घटनेची निंदा करावी तेवढी थोडी आहे.” असे दरेकर यांनी ट्विट केलं आहे.

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment