सरकार अँक्शन मोडमध्ये! मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवली सर्व पक्षीय बैठक

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज्य सरकार आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, मराठा आंदोलकांनी जाळपोळ करणे, गाड्या फोडणे, दगडफेक करणे असे प्रकार घडवून आणले आहेत. यामुळे बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदीचे … Read more

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यातील अनेक ठिकाणी कमी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पहिल्या टप्प्यात … Read more

तुम्ही जीव पणाला लावू नका! उपोषण मागे घेण्यासाठी राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना पत्र

Raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत झालेली आहे. परंतु तरीदेखील जरांगे पाटील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे … Read more

मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत.., जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांशी स्पष्टच बोलले

Shinde and jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रात द्या असे सांगितले. त्याचबरोबर, “मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत. त्यामुळे ते नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाहीत. आपणही अर्धवट आरक्षण घेणार नाही” अशी भूमिका मांडली. याबाबतची … Read more

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण!! या 2 जिल्ह्यात संचारबंदी लागू

Beed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज बीड,  धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर बीड आणि धाराशिव जिल्हयातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने … Read more

भाजपला मोठा फटका! मराठा आरक्षणासाठी आणखीन एका आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

laxman mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मुख्य म्हणजे, सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आता सत्तेधारी नेत्यांनीच सरकार विरोधात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. काल भाजप खासदार हेमंत पाटील मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. त्यानंतर आज भाजपच्या आणखीन एका नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे याचा मोठा झटका भाजपला बसला आहे. मराठा … Read more

गृहमंत्र्यांचा तातडीनं राजीनामा द्यावा.., सुप्रिया सुळेंची थेट मागणी

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा” अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. तर, राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे … Read more

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या! सरकारच्या निर्णयावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “उद्यापासून राज्यांतील ज्या मराठ्यांच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी घोषणा केली होती. त्यावर आता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आले आहे. जर … Read more

आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश

Rahul Narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच … Read more

लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन हेमंत पाटील राजीनामा देणार? राजकिय वर्तुळात मोठ्या घडामोडी

Hemanat Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देण्यासाठी आज हेमंत पाटील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भेट यांची घेणार आहेत. त्यामुळे आज राजकिय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा समाजाला … Read more