अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी सोमवारी ६ जानेवारी सायंकाळी ट्रम्प यांना फोन केला, यावेळी दोघांनीही एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, भारत-अमेरिका संबंधांवरही यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांचे संबंध आधीपेक्षा मजबूत झाले आहेत, एकमेकांवरील विश्वासामुळे ते आणखी दृढ होत आहेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळात संबंध मजबूत झाले आहेत. जे एकमेकांवरील विश्वासामुळे आणखी घट्ट होतील. 2019 मध्ये दोन्ही देशांनी खूप प्रगती केली, ज्यामुळे दोन्ही देशांची मैत्री घट्ट झाली आहे, असं मोदी म्हणाले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधानांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशाचे संबंध अधिक चांगले होत असल्याचं सांगितलं.

Leave a Comment