धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_inचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या या अकाऊंटला २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने यावरुन ट्वीट देखील केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय रिलीय फंडमध्ये क्रिप्टो करंसीने दान देण्याची मागणी याद्वारे करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी मागणी हॅकरने केली होती.

जॉन विक (hckindia@tutanota.com) या अकाऊंटने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक केलंय. आता हे ट्वीट डिलीट करण्यात आलंय. आम्हाला याबद्दल माहिती मिळाली होती आणि सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आली होती अशी माहिती ट्वीटरने दिली. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत.

No description available.

आणखी कोणती अकाऊंट हॅक झाली का? याबद्दल अधिक माहिती नसल्याचेही ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले. उबेर आणि एप्पलच्या कॉर्पोरेट खात्यांमध्येही छेडछाडीचा प्रयत्न झाला. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसचे अकाऊंट दोन वेळा हॅक झाले. त्यानंतर त्याने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook