३० वर्षांपासून रोज १५ किलोमीटर चालणाऱ्या पोस्टमनची कहाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कुनूर | पोस्टमन नावाचा प्राणी बराच सहनशील मानला पाहिजे. पूर्वीच्या काळी आणि आताही कधी चालत, कधी सायकलीवर तर कधी गाडीवर जात या सरकारी नोकरदाराने आपली जबाबदारी चोख पाडल्याचं दिसलं आहे. या कामात पुरुषांसोबत महिलाही खांद्याला खांदा लावून आहेतच बरं का..!! आज आपण पाहतोय ती गोष्ट आहे डी.सिवन या अवलियाची.

मागील ३० वर्षांपासून तामिळनाडूतील दुर्गम भागात पत्र पोहचवण्याचं काम डी.सिवन यांनी इमान-इतबारे केलं आहे. कुनूर हा त्यांच्या ३० वर्षीय कामकाजाचा केंद्रबिंदू राहिला. हे काम करताना गेली ३० वर्षं ते रोज १५ किलोमीटरची पायपीट करतायत. दुर्गम भागातून, निसरड्या रस्त्यांच्या जोडीने, प्राण्यांच्या भीतीतून पुढे जात त्यांनी कोणताही खंड पडू न देता ही सेवा अविरतपणे चालू ठेवली.

त्यांच्या या कामाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारही देण्यात आले. या भागातील जिल्हाधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर त्यांच्या कामाचं, निष्ठेचं वर्णन करणारी एक पोस्ट केली आणि त्यानंतर देशभरातील लोकांपर्यंत सिवन पोहचले.

३० वर्षांच्या अविरत सेवेनंतर सिवन आता निवृत्त झाले असून त्यांच्या सेवेबद्दल सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्यांच्या अविश्रांत सेवेबद्दल त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, त्यांना योग्य तो सन्मान दिला जावा अशी भावनाही अनेक नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

 

Leave a Comment