राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे सभा होत आहे. या सभेत विखे पाटील भाजपात जाहीर प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.

तसेच माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ १७ एप्रिल रोजी मोदींची अकलूज येथे सभा होत असून या सभेत विजयदादा भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या दोन दिग्गज नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाला वेगळे वळण लागणार असल्याचं बोललं जातंय.

राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी मागील महिन्यात भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना अहमदनगरमधून तिकीट दिले. यानंतरच्या काळात वडील राधाकृष्ण विखे हे मुलगा सुजयचा उघडपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे ते भाजपात लवकरच जातील अशी चर्चा सुरू होती. विखेंच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला असून, येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील.

Leave a Comment