आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे पण वर्क फ्रोम होम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पण वर्क फ्रोम होम करत आहेत.

राजेश टोपे यांनी ट्विट करुन आपण घरातूनच काम करत असल्याची माहिती दिली आहे. मी पण घरीच आहे. तुम्ही पण घरीच थांबा असे म्हणत टोपे यांनी नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या अाता ३२७ वर पोहोचली आहे. जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. राज्यात आज कोरोनामुळे दुसर्‍या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील कर्फ्यूमध्ये मुख्यमंत्र्यांकडून वाढ केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या कानाकोपर्यातील सर्व ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर. आम्हाला 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून Whatsapp करा. आम्ही तुम्हाला ब्रेकिंग बातम्या Whatsapp वर पाठवू.

हे पण वाचा –

Coronavirus Update | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार | HM WhatsApp News Bulletin | 22 मार्च

Leave a Comment