जगाला शांती देण्यासाठी मनाला अयोध्या बनवण्याची गरज- मोहन भागवत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन पार पडले. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित होते. म मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पडल्या नंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमंत्रितांशी मोहन भागवत यांनी सवांद साधला. जगाला शांती देण्यासाठी मनाला अयोध्या बनवण्याची गरज आहे. आपल्या मनातील अयोध्या सजवण्याची गरज आहेत. राम मंदिर पूर्ण होण्यापूर्वीच मनमंदिर तयार झालं पाहिजे, असं मोहन भागवत म्हणाले. द्वेष, विकार, भेदभाव यांना तिलांजली देण्याची गरज आहे. तसंच संपूर्ण जगाला आपलेपण देणारी व्यक्ती असायला हवी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं
आजचा आनंदाचा क्षण आहे. आम्ही संकल्प केला होता. तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अनेक वर्ष काम केल्यानंतर हे काम पूर्ण होईल असं म्हटलं होतं. ३० व्या वर्षाच्या सुरूवातीला संकल्पपूर्तीचा अनुभव मिळाला. अनेकांनी आज बलिदान दिलं आहे. ते सूक्ष्म रुपात आपल्या सोबत आहेत, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसं मंदिर बनेल तसं मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment