प्रभू रामचंद्रांसोबतच्या मोदींच्या ‘त्या’ फोटोवरून काँग्रेसनं काढला चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं सोशल मीडियातून दिसून आलं. पंतप्रधान मोदी यांचे फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यातील एका फोटोवरून काँग्रेसनं भाजपाला सवाल केला आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी हे प्रभू रामचंद्रांचा हात धरून अयोध्येत येत आहेत. सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या या फोटोवरून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे.
शशी थरूर ट्विट करत म्हणाले..

“ना प्रेम शिकलात, ना त्याग शिकलात,
ना करूणा घेतली, ना अनुराग शिकलात
स्वतःला रामापेक्षा मोठं दाखवून खुश होणाऱ्यांनो,
तुम्ही श्री राम चरित मानसमधील कोणता भाग शिकलात?,”

शशी थरूर यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भूमिपूजनानंतर एक ट्विट केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment