हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना पण कळणार नाही ; रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले होते. राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, रामदास आठवले यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. हे सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होईल, असे आठवले म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. पण, हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असे  रामदास आठवले म्हणाले

मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या कंगनाच्या भूमिकेचा आम्ही विरोधच केला. परंतु, मुंबईत तिला येऊ देणार नाही या घटनाविरोधी भूमिकेला विरोध दर्शवत त्याबाबत कंगनाला पाठिंबा दिला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर कंगना त्यांना भेटली असती तर ताबडतोब हा विषय मिटला असता. त्यामुळे कंगनाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन विषय संपवावा, असे आवाहनही आठवले यांनी केले. जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. यात नवीन काही करण्याची गरज नाही. जीएसटी पैसा मिळाला पाहिजे या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणजे दिशाभूल करणारे, थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. मराठ्यांना आरक्षण हा माणूस कधीही देऊ शकत नाही कारण मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment