मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश ; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम समाजाचे मोठे नेते म्हणून गणले जातात. नुकतेच त्यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ते म्हणाले. ओवेसी यांनी ट्विट करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

‘केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुस्लिमांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये या खोट्या मुद्द्यावर संघाचे हिंदुत्व आधारलेलं आहे. खोट्या हिंदुत्ववादी संघाच्या विरोधात आव्हान उभारण्याचं काम संसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच्या जास्तीत जास्त उपस्थितीतून होईल’, या आशयाचं ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.

ओवेसी यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत पाच जागांवर विजय प्राप्त केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला मिळालेल्या पाच जागा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहेत. बिहारमधील पाच जागांवर मिळालेल्या यशानंतर ओवेसी यांचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर उभारी घेत असल्याचं बोललं जात आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांचं नाव मुस्लिम समाजातील सर्वात मोठे नेते म्हणून घेतलं जाऊ लागलं आहे.

खरंतर एआयएमआयएम पक्षाची स्थापना १९२७ साली झाली होती. पण त्यावेळी हा पक्ष केवळ तेलंगणा पुरताच मर्यादीत होता. १९८४ पासून हैदराबादच्या लोकसभेच्या जागेवर या पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. आता या पक्षानं महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही आपलं खातं उघडलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment