अखेर सचिन पायलट यांचे बंड शमले! काँग्रेसमध्ये मिळणार मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या महिन्याभरापासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा सामना रंगला आहे. मात्र, आता हा सामना निकाली लागण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण म्हणजे बंडखोरीनंतर सचिन पायलट हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार आहेत. सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने एक समिती गठीत केली आहे, जी सचिन पायलट यांच्या सर्व समस्या सोडवेल. या आश्वासनांमुळे सचिन पायलट यांनी बंड मागे घेण्याचे मान्य केले असून लवकरच त्यांना काँग्रेसमध्ये एक मोठं पद मिळू शकतं.

सचिन पायलट हे आज दुपारी 4 वाजेपर्यंत जयपूरला पोहोचतील. सचिन पायलट सुमारे एक महिन्याच्या बंडखोरीनंतर राजस्थानला परतत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे देखील जैसलमेरला पोहोचतील. सर्व आमदार जिथे मुक्कामी आहेत, तेथे काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर चर्चा होईल.

सोमवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सचिन पायलट आणि त्यांचे सहकारी आमदार यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी सर्व आमदार जयपूरला जाऊ शकतात. म्हणजेच 14 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनापूर्वी काँग्रेसने आपले सरकार वाचवले आहे. दुसरीकडे काँग्रेस हायकमांडने अशोक गहलोत यांच्याशीही चर्चा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment