कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा अशी राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत – सदाभाऊंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । कोरोनाच्या काळात शेतकरी हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होत आहे. सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची विल्हेवाट बघितली तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ ५ हजार कोटी येतील. कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा अशी मदत राज्याच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केला आहे.

फळलागवड असणाऱ्या शेतकऱ्यांला प्रतिहेक्टरी १ लाख रूपये देणे आवश्यक आहे. बागायत उत्पादक शेतकऱ्यांला ५० हजार तर कोरडवाहूसाठी २५ हजार रूपये देणे आवश्यक आहे. तरच कोलमडलेला शेतकरी सावरला असता अस सदाभाऊ म्हणाले. पण दिवाळी तोंडावर येऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया पण जमा झाला नाही असा आरोप त्यांनी केला.

तुमचे पंचनामे होतील तेव्हा होतील पण दिवाळीच्या तोंडावर तरी त्या शेतकऱ्यांना गोडधोड करण्यासाठी तरी मदत करायला हवी होती. जुन्या कपड्यांनी एकवेळ आम्ही दिवाळी साजरी करू पण शेतकऱ्यांच्या अंगणात दिवा तरी लागुद्या दिवाळी तोंडावर आलेली असल्याने लवकर मदत देवून राज्य सरकारने मेहरबानी करावी असंही सदाभाऊ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment