तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून नियुक्ती केली आहे,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांचे नाव घेतले की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. संजय राऊत यांनी त्याला उत्तर देताना म्हटले आहे की, चांगली गोष्ट आहे. आमचे नाव घेतले की कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केली आहे.

तुमचा जो शेतकरी अन्नदाता आहे, तुम्ही त्याला दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. महाराष्ट्राप्रमाणे पंजाब, हरियाणामधील शेतकरी आहे. ज्यांनी हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment