साताऱ्यात बदलले वारे ?? ….पवारांच्या बैठकीला आले शिवेंद्रसिंहराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. आज शरद पवार हे साताऱ्यातील कराडमध्ये पोहोचले. पण, यावेळी बैठकीला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजरीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. तर दुसरीकडे भाजपचे खासदार उदयनराजेंनीही या बैठकीकडे पाठ फिरवली.

कराड हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला मानलं जातं.शरद पवारांच्या उपस्थितीत कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , वाईचे आमदार मकरंद पाटील , कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, हे उपस्थित आहेत.

आश्चर्य म्हणजे या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण गैरहजर होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही, असं सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आमदार शिवेंद्रराजे भोसले या बैठकीला उपस्थितीत होते. शिवेंद्रराजे बैठकीला उपस्थितीत राहिल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहे.

Leave a Comment