मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? ; शिवसेनेचा मोदी सरकारला संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यात भाजप विचारांची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?” असा संतप्त सवाल शिवसेनेन उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्रात त्यांनी आपली रोखटोख भूमिका मांडली आहे.

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात

“भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, कोरोनावर ‘लस’ येताच ती देशातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. पंतप्रधानांनी लसीचे वितरण करताना कोठेच जात, धर्म, प्रांत, राजकारण मध्ये आणले नाही, पण आता बिहार विधानसभेच्या प्रचारात भाजप नेत्यांनी विचित्र भूमिका घेतली आहे. कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगितले आहे.

‘‘तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला कोरोनाची लस फुकट टोचू’’ असा हा सौदा आहे. मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा? मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? याचे उत्तर द्या,” असेही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

पण समजा बिहारात सत्ताबदल झाला तर भाजप ही लस बिहारला देणार नाही काय? अनेक राज्यांत भाजपची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय?” असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत,” असा सल्लाही शिवसेनेनं केंद्राला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment