बीपी, शुगर वाढली की राणे काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही ; अब्दुल सत्तारांनी राणेंना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी जहरी टीका केली होती. उद्धव ठाकरे पुळचत आहेत, बाळासाहेबांच नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. असा घणाघात राणेंनी केला होता. तसेच आमच्या वाट्याला गेलात तर मातोश्री वरील सगळं काही बाहेर काढेन असा इशारा सुद्धा दिला होता. राणेंच्या या टीकेला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.बीपी, शुगर वाढली की, काय आणि कसं बोलतात हे नारायण राणेंनाच कळत नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले. उरण येथील पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

करंजा मच्छीमार बंदराच्या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी सत्तार उरण येथे आले होते. त्यावेळी  मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान न करता, भाजपने गद्दारीच केली, याची जाहीरपणे कबुली रावसाहेब दानवे यांनीच दिली असल्याचे सांगत, सत्तार यांनी दानवेंच्या भाषणाची व्हिडीओ क्लिपच पत्रकारांना दाखवली. हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून, भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत असल्याची टीकाही सत्तार यांनी केली. पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारस आहेत. त्या सेनेत आल्यास त्यांचे स्वागतच होईल. शिवसेनेशी केलेल्या गद्दारीचे भोग आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला भोगावे लागतील, असेही सत्तार यांनी सांगितले.

केंद्र सरकारने राज्याला देणं असलेली ३८ हजार कोटींची रक्कम अद्यापही दिलेली नाही. त्यातच कोविडची समस्या निर्माण झाली असली, तरी विकासाचे एकही काम राज्य सरकारने थांबविलेले नाही. नैसर्गिक आपत्तीतही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या तरतुदीपेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आली आहे. जसजशी आर्थिक स्थिती सुधारेल, तशी त्यामध्ये वाढ केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment