Breaking News | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उचलले हे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावनी झाली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही असे म्हटले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले असून याचिका फेटाळली आहे. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याचिकाकर्त्याने महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्विच्च न्यायालयात केली होती. विशेषत: मुंबईतील काही घटनांना समोर ठेवून सदर मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून हालचाली करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे सरकार म्हणजे तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टीकणार नाही, असेही अनेकदा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी म्हटलं होत. त्यातच, सरकारच्या स्थापनेपासून राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या संकटांचा सामना करताना, सरकार अपयशी ठरल्याचं सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही होत आहे. मात्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.

Leave a Comment