कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही ; सुप्रिया सुळेंचा योगींना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं नात दुधात जशी साखर विरघळते, असं नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचंही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे  ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील.

योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधाण्याची शक्यता आहे.  यानंतर बॉलिवूड निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथांवर केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सरकारने असं काही होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment