गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून महाविकासआघाडीच्या भवितव्याशी निगडित रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद आणि बंडाळींमुळं याचे थेट परिणाम हे महाविकासआघाडी सरकारवर होतील असं आठवले यांनी स्पष्ट केलं.

इतकंच नव्हे तर सध्याच्या सर्व घडामोडी पाहता महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय महायुतीच्या बाजूनं कौल देत यंदाच्या वर्षी श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकासआघाडी सरकारचंही विसर्जन होईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल, असं भाकीत त्यांनी केलं.

आठवलेंनी केलेलं हे भाकीत पाहता आता पुढं काय? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच पार्थ पवार आता मोठा निर्णय घेणार असल्याचंही वृत्त हाती आलं आहे. त्यामुळं आता पार्थ पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असेल. दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment