रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या ‘या’ दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली टर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी भारतीय रेल्वेने इतिहास रचल्याची माहिती दिली आहे. १ जुलै रोजी भारतातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के रेल्वेच्या गाड्या नियोजित वेळेत धावल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. ट्विटरवरुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे नमूद केलं आहे. मात्र त्यांच्या या दाव्यावरुन नेटकऱ्यांनी एकीकडे लॉकडाउनमुळे रेल्वे सेवा सर्वाधिक प्रभावित झालेली असतानाच दुसरीकडे रेल्वे मंत्र्यांनी अशापद्धतीने स्वत:चीच पाठ थोपटून घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अनलॉक १ नंतर जुलैपासून अनेक राज्यांमध्ये अनलॉक २ ची घोषणा झाली असली तरी रेल्वे मंत्रालयाने प्रवासी वाहतूक मोजक्या प्रमाणत सुरु ठेवली आहे. त्यामुळे आधीच रेल्वे कमी संख्येने धावत असतानाच रेल्वे मंत्र्यांनी वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावण्याचा प्रमाण १०० टक्के असल्याचे सांगणे हा आपलेच कौतुक करण्याचा केविलवाणा प्रकार असल्याचं अनेकांनी गोयल यांच्या ट्विटखाली म्हटलं आहे.

कोरोना लॉकडाउमुळे वेळापत्रक कोलमडून पडलेलं असता रेल्वे वेळेत धावल्या हा दावा हस्यास्पद असल्याचे काहींनी म्हटलं आहे. एकूणच गोयल यांच्या ट्विटवरील प्रतिक्रिया पाहता या ऐतिहासिक लॉकडाउनमध्ये रेल्वे १०० टक्के वेळेत धावल्याचा रेल्वे मंत्र्यांनी केलेला दाव्याची ट्विटरवर सर्वसामान्य टर उडवत असल्याचे चित्र दिसत आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment