पंढरपूरातील आंदोलनाला स्वतः हजर राहून पाठिंबा देणार- प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची सातत्यानं मागणी होत आहे. तसंच महाराष्ट्रातल्या ह.भ.प. महाराज, विश्व वारकरी सेनेने कीर्तन, भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पाठिंबा जाहीर केला आहे.

“माणसांचे आयुष्य कैद करणाऱ्या सक्तीच्या लॉकडाउनला आम्ही सातत्याने विरोध करत आहोत. अशातच आता महाराष्ट्रातल्या ह.भ.प. महाराज, विश्व वारकरी सेनेने कीर्तन, भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला मी स्वतः हजर राहून पाठिंबा देणार आहे,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जवळपास गेल्या पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत. दरम्यान, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणताना इतर ठिकाणांना सुरू होत असताना मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची राज्यात मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment