Video: देवेंद्र फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन; माईक हातात घेत गायिले भजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या भूमिपूजन झाले. राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावता आली नसली तरीही अनेकांनी आपल्या परिनं या सोहळ्यात सहभागी होत या क्षणाचा आनंद लुटला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यापैकीच एक.

कोरोना काळातील काही आव्हानं आणि केंद्रानं आखलेली नियमावली या साऱ्याचं पालन करत, सावधगिरी बाळगत भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी फार कमी जणांची हजेरी होती. पण, तिथं जाणं शक्य झालं नसलं तरीही फडणवीसांनी मुंबईतील भाजप कार्यालयात आपला आनंद साजरा केला. राम मंदिराचे स्वप्न साकार होत असतांना देवेंद्र फडणवीस यांचा आनंद यावेळी गगनात मावेनासा झाल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेला व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे.

हा व्हिडिओ पाहता फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन झाल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस मंचावर बसून माईक हातात घेऊन भजन गाताना दिसत आहेत. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यादिवशी देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय वेगळे आणि अद्वितीय रूप यावेळी पाहायला मिळाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment