विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळणार कॅबेनेट मंत्रिपद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित असा मंत्री मंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे. राज भवनाच्या गार्डनमध्ये सध्या या शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. तर अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबेनेट मंत्री पद मिळण्याच्या चर्चेला पुन्हा रंग आला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय आलेख बघून भाजप पक्ष श्रेष्ठींनी त्यांना या पदी विराजमान करण्याचा मनसुबा आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले

२००९ साली राष्ट्रवादीत असताना विजयसिंह मोहिते पाटील यांचा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्याआधी ते कधीच पराभूत नझालेल्या नेत्यांच्या यादी मध्ये येत होते. त्यांच्या पराभवा नंतर मोहिते पाटील घराण्याच्या पथनाला राष्ट्रवादीने सुरुवात केली. राष्ट्रवादीत होणार अन्याय कधी तरी दूर होईल या आशेने मोहिते पाटील घराण्याने गेली १० वर्षे राष्ट्रवादीत घालवली. मात्र त्यांच्या पदरी शेवट पर्यंत निराशाच पडली.

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची लागणार मंत्री पदी वर्णी

अखेर २०१९च्या लोकसभेचे माढ्यातून तिकीट सुद्धा आपल्याला दिले जाणार नाही असे लक्षात येताच मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माळशिरस या आपल्या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीला शह देत भाजपला १ लाखाचे मताधिक्य दिले. त्यांच्या या मताधिक्यावर खुश होऊनच अनुभवी विजयसिंहांना मंत्री मंडळात सामावून घेण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील मंत्री पदापासून वंचितच!

Leave a Comment