आता तरी चंद्रकांत पाटलांनी बोलघेवडेपणा बंद करावा’ ; विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘विधान परिषदेच्या 6 जागाही जिंकू, पुणे तर एकहाती जिंकू’, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पण पुणे तर सोडाच पण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला हाणलाय. चंद्रकांत दादांनी आता बोलघेवडेपणा बंद करावा, अस वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे.

“आपण काय बोलतो याचा काही ताळमेळ नाही, चंद्रकांत पाटील यांनी बोलघेवडेपणा बंद करावा. भाजपनं यापूर्वी कधी एकत्रित निवडणुका लढवल्या नाहीत का? आयजीच्या जीवावर बायजी उदार, असा प्रकार भाजपने करु नये”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले. राज्यावर कोरोनाचं संकट असतानाही आम्ही फक्त बोलघेवडेपणा न करता शांतपणे काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेमुळंच हा विजय मिळाल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment