राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या भाजप खासदार दिलीप गांधी यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी रात्री भेट घेतली. खासदार गांधी राधाकृष्ण विखे यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढवत आहेत. खासदार गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच भूमिका जाहीर करताना पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार, असे स्पष्ट केले होते. मात्र, ते अद्याप प्रचारात सक्रिय झालेले नव्हते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले असले, तरी सुद्धा सुजय यांच्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गांधी व विखे यांच्यात बंद खोलीमध्ये स्वतंत्रपणे चर्चाही झाली.

गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केलेली आहे. त्यांनी मतदारसंघात बैठकाही सुरू केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गांधी व विखे यांच्या चर्चा झाल्याचे समजते. मात्र आमची भेट औपचारिक होती असे विखे यांनी पत्रकारांना सागितले.

Leave a Comment