देवेंद्र फडणवीस हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री , पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येणार ; भाजप नेत्याचा दावा

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत

सकलेन मुलाणी । सातारा

कराड भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर असून त्यानी कराड येथे यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ येथे दर्शन घेतले यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीसाठी युवा वर्ग मोठा उत्साही असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा मतदारसंघ असल्याने आमची जबाबदारी वाढली आहे.अशावेळी या ठिकाणी भाजपाचाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री आहे.

राज्यातल्या सरकारला युवकांविषयी कुठल्याच प्रकारच्या आत्मीयता राहिलेली नाही. ज्या पद्धतीने आम्ही मायबाप सरकार म्हणायचो मायबाप शब्दाला काळिमा फासणारे सगळे प्रकार यांच्याकडून होत आहेत. तीन वेगवेगळ्या विचारांची लोक फक्त स्वार्थासाठी एकत्र येतात.ज्याच आयुष्य फक्त शिव्या घालण्यात गेले अशी लोक एकत्र येतात.बंद खोलीत एकमेकांना शिव्या घालतात व बाहेर आल्यावर हातात घालून दाखवतात आम्ही एक आहोत हे का तर फक्त सत्तेच्या लालचेसाठी व आपल्या तिजोरी भरण्यासाठी अशाप्रकारचे कामकाज या सरकारचे चालू आहे.

राज्यातले सगळे नेते घरातूनच राज्य चालवतात तर एकीकडे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून जनतेच्या समस्या सोडवतायत व मदत करतात. व नागरिकांचा आवाज होण्याचा प्रयत्न करतात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असेही पाटील यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook