छत्रपती उदयनराजे भोसलेंना राज्यसभेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दिली तंबी, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संसदेच्या राज्यसभा सदनात पार पडला. आजच्या शपथविधीमध्ये भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ”जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना चांगेलचं  फटकारले .

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेताना “I Udayanraje Pratapsinhraje Bhosale ” अशा इंग्रजी शब्दात सुरुवात केली आणि शपथ झाल्यानंतर त्यांनी सदनात “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी” अशी घोषणा दिली. त्यामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे भोसले यांच्या घोषणा दिल्याच्या कृतीवर आक्षेप घेतला. “तुम्ही सदनात नवीन आहात, अशा प्रकारच्या घोषणा देण्याची मुभा सदनात नाही, त्यामुळे हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल असं व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. याशिवाय ”हे, पुन्हा सांगण्याची गरज भासू नये ” अशा तिखट शब्दात उदयनराजे यांना तंबी दिली.

राज्यातील ‘या’ नवनिर्वाचित खासदारांनी घेतली राज्यसभेत शपथ
भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांनी आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. मार्च महिन्यात खासदारपदी महाराष्ट्रातील ७ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी ६ जणांनी आज शपथ घेतली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. इंग्रजीमध्ये आठवले आणि उदयनराजेंनी यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. इतर नेत्यांनी मराठीतून शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. याबरोबर भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचाही शपथविधी झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment