आम्ही केलेल्या कामामुळे आम्हीच विजयी होणार! अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

टीम हॅलो महाराष्ट्र। आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तयार असून यावेळी जनता आमच्या कामावर आम्हाला मतदान करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दिल्लीच्या जनतेला आवाहन करत केजरीवाल म्हंणाले कि,”दिल्लीत आम्ही जर प्रामाणिकपणे चांगलं काम केलं असेल तरच आम्हाला मतदान करा अन्यथा मतदान करू नका.”

ते पुढे म्हणाले कि, जर आता तुम्ही सरकार बदलली तर दिल्लीतील विकास थांबून जाईल.त्यामुळं आम्हाला मतदान करा.” दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांवर ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल.

त्यामुळं राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आप आणि भाजप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.आम्ही केलेल्या कामामुळेच आम्ही विजयी होऊ असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com