गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांना भाजप प्रवेशाची ‘या’ नेत्यानं दिली ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्यावर पक्षातून टीका झाल्याचं समोर आलं होतं. काँग्रेसमधील 5 माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या. या पत्रानंतर झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर टीका झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. या टीकेचा हवाला देत या दोन्ही नेत्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर देण्यात आली आहे.

रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपात येण्याची या दोन्ही काँग्रेस नेत्यांना ऑफर दिली आहे. “काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी प्रचंड मेहनत घेतली. जर राहुल गांधीजी त्यांच्यावर आरोप करत असतील, तर त्यांनी पक्ष सोडावा. भाजपामध्ये त्यांचं स्वागत करण्यास तयार आहोत,” अशी ऑफर आठवले यांनी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारं हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, “पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी. पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचं विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली होती . लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या होत असलेल्या घसरणीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षांनं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं नाही,” असं या नेत्यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment