कोरोनाशी लढा चालू असताना RSS नक्की काय करतंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | जयश्री देसाई

भारतात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सरकार आणि पोलीस यंत्रणा दिवसरात्र एक करून झटते आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने २१ दिवसांची संचारबंदी संपूर्ण देशभर लागू केली आहे. अशावेळी देशात अत्यावश्यक सोडता इतर सर्व कार्यालये, कारखाने बंद आहेत. त्यामुळे सर्वजण घरी आहेत. पण या अशा काळात असे बरेच नागरिक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर अवलंबून आहे. कोरोना नेमका काय आहे हे सुद्धा काहीना माहीत नाही. विविध संस्था संघटना आपापल्या पातळीवर या अशा लोकांसाठी काम करते आहे. राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या संकटकाळात कोणत्याही प्रकारची मदत करण्यास संघ तत्पर असल्याचे सांगितलं आहे. यानुसार संपूर्ण देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या कामात अग्रेसररित्या सहभागी होतो आहे. अगदी मास्कपासून जेवणाच्या पाकिट वाटपांपर्यंत आणि रस्त्यांपासून दवाखान्याच्या स्वच्छतेपर्यंत सर्व प्रकारच्या कामांमध्ये संघ योगदान देत आहे.

भाजीपाला विक्रीसाठी गाडी

महाराष्ट्रासह भारतातील विविध भागांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विविध संस्था या संकटकाळात मदतीसाठी धावून आल्या आहेत. 
अन्न-धान्य वाटप –  संचारबंदीमुळे देशभरात ठिकठिकाणी हातावर पोट असणारे कामगार, त्यांची कुटुंबे, रस्त्यावर रहाणारे लोक, वसतिगृहात राहणारा आणि घरापासून दूर असणारा तरुणवर्ग, मध्येच अडकलेले ट्रक चालक, क्लिनर, प्रवासी या आणि अशा अनेक नागरिकांना दोन वेळ अन्न पुरविण्याचे काम विविध ठिकाणी सुरु आहे. मुंबईमध्ये अन्नपूर्णा या नावाने हा उपक्रम होतो आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. अहमदनगरमध्ये रोज २५० जेवणाची पाकिटे तयार करून ती गरजूंपर्यंत पोहोचवली जात आहेत. पुण्यात संघाच्या जनकल्याण समितीने आपदा केंद्र या नावाने मदतकेंद्र सुरु केले आहे. इथे लोकांसाठी जेवणाची पाकिटे तयार केली जात आहेत. कर्नाटकात सेवा वस्त्यांध्ये जाऊन अन्न पुरविले जात आहे. केरळ, गुजरात, मध्यप्रदेश आणि जम्मू काश्मीरसह इतर भागातही अन्न पुरविले जात आहे. लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन केले जात आहे. कार्यकर्त्यांचे व्हाट्सग्रुप तयार करण्यात आले आहेत. ज्याला जिथे मदत आवश्यक असेल तिथे पोहचविण्यात येते आहे. जमा झालेल्या निधीतून धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करून गरजुंना पोहोचविल्या जात आहेत.

जेवणाचे पॅकेट

सामाजिक विलग राहण्यासाठी (सोशल डिस्टन्स) प्रयत्न कल्याणमध्ये कार्यकर्त्यांनी किराणा मालाची दुकाने आणि मेडिकल इथे गर्दी टाळण्यासाठी लोकांना चौकोन आखून दिले आहेत. तळेगाव दाभाडे येथे भाजी मंडईत गर्दी होऊ नये म्हणून चौकोन आखून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हात निर्जंतुकीकरण सॅनिटायझर देऊन विशिष्ट अंतरावर उभे राहण्यासाठी सांगण्यास पोलिसांसोबत संघाचे कार्यकर्ते ही सामील झाले आहेत. पुण्यात पर्वती परिसरात आपदा समितीमार्फत रस्त्यावर पोलिसांसाठी टेन्ट उभे करण्यात आले. कल्याणमध्ये पोलिसांच्या मदतीसाठी काही स्वयंसेवकांची नावे नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे देण्यात अली आहेत.

स्वच्छता – या विषाणूपासून बचाव करण्यासाठी केवळ अन्नधान्य पुरवठा नाही तर योग्य स्वच्छताही गरजेची आहे. याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये कोठामंगलम परिसरात पोलिस आणि अग्निशामक दल यांना मदतीचा हात देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कचऱ्याची ठिकाणे स्वच्छ केली. त्रिचूर जिल्ह्यातील कोडुंगल्लर सरकारी दवाखान्यात हॉस्पिटल कर्मचारी आणि इतर यंत्रणेला मदत करीत वॉर्ड स्वछता करण्यात आली. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत असताना कार्यकर्ते रस्त्यावर उतरून स्वतः स्वच्छता करतानाही दिसत आहेत.

पोलीस बांधवांसाठी राहुट्या

रक्तदान – संचारबंदीच्या काळात आजारी लोकांना रक्ताची गरज भासू शकते आणि या काळात बाहेर पडायचे नसल्यामुळे ती पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. म्हणून विविध सामाजिक संस्थांनी रक्तदानाचे आवाहन सोशल मीडियावर केले होते. रक्तदानाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ केशव हेडगेवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आले. पुण्यात जनकल्याण समितीने जनकल्याण रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

जनजागृती – गुजरात, मध्यप्रदेश या भागांमध्ये संघाचे कार्यकर्ते दारोदारी जाऊन मास्क आणि सॅनिटायझर वाटप करीत आहेत. पण केवळ वाटप न करता लोकांना हात कसे धुतले पाहिजेत याचे प्रात्यक्षिकही दाखवत आहेत. स्वच्छता कशी ठेवली पाहिजे त्याचबरोबर काय केले पाहिजे आणि काय नाही याची माहिती देत आहेत. लाऊडस्पिकरवर सर्वांना याचं गांभीर्य समजावून सांगत असतानाच गरजूंना मदत करण्याचं आवाहनही केलं जात आहे. संचारबंदीच्या या काळात इतर सामाजिक संघटनांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभरातील काम वाखाणण्याजोगे आहे.

गरजूंना दुकान सामानाचं वाटप

कल्याण जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ विवेक मोडक यांच्या मते शासन यंत्रणेकडून घरात राहण्याचे जे आवाहन करण्यात आले आहे, त्यानुसार सर्व स्वयंसेवकांना घरी राहण्यास सांगितले आहे. शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे ही एक सेवाच आहे असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे महानगरपालिकेत स्वयंसेवकांची यादी दिली असून गरज असेल तेव्हा स्वयंसेवक सदैव तयार असतील अशी माहितीही त्यांनी दिली. कल्याण महानगरपालिका आणि संघाच्या सहकार्यातून रोजंदारीवर काम करणाऱ्या १२० कुटुंबाना काही दिवस पुरेल इतका शिधा देण्यात आला आहे.

सदरची माहिती ही सोशल मीडियावर मदतीनंतर केल्या गेलेल्या पोस्ट, प्रत्यक्ष दिलेल्या भेटी, लोकांशी फोनवर केलेला संपर्क यातून मांडण्यात आली आहे. यासंदर्भातील काही लिंक्स खाली देत आहोत.

1) कल्याण – https://m.facebook.com/story.php?story_fbid=3000123473372772&id=100001254462047?sfnsn=wiwspmo&extid=qRADsXaUo3lJZxz0

2) राष्ट्रवादी काँग्रेस आणि RSS एकत्र – https://m.facebook.com/story.php?story_fbid=2989434214476775&id=100002306763592

3) पिंपरी-चिंचवड – https://m.facebook.com/story.php?story_fbid=2811127465672590&id=100003260920347?sfnsn=wiwspmo&extid=ZMQ8rE2I5HNxhjRF

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment