दिवंगत राष्ट्रपती प्रवण मुखर्जींच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी काढले भाजपला चिमटे, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी श्रद्धांजली अर्पण केलीय. यावेळी त्यांनी प्रणव दांच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले. राष्ट्रपती प्रवण मुखर्जी एकदा मुंबई आले असता, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झाले असं म्हटलं होत. मात्र काही जण रात गयी बात गयी ,खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

प्रणव दांचे कुणाशी वैर नव्हते. भाषणबाजी पेक्षा त्यांना काम जास्त महत्वाचे वाटे. प्रणवदा यांनी अनेकदा त्याकाळी सरकारला वाचवलं, पक्षाला वाचवल्याचे मुख्यमंत्री ठाकरे विधानसभेत म्हणाले. जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणवदांना उघड पाठिंबा दिला. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट होती. समोरच्याचा आब राखून बोलणे, ऐकून घेणे अशा गोष्टी त्यांच्या स्वभावात पाहायला मिळाल्या.एकदा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडून बोलावणे आले.

भेटल्यावर त्यांनी महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं. ते म्हणाले मला वाटलं नव्हतं मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे असं त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी ,खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडे इशारा करत काढला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment