Pomegranate Plantation | दुष्काळी भागात डाळिंबाची शेती करून शेतकऱ्याने केला पराक्रम, घेतले लाखोंचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pomegranate Plantation | अनेक शेतकरी हे आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता वेगवेगळ्या पद्धतीची पिके घ्यायला लागलेली आहेत. अनेक फळांची पिके घेऊन शेतकरी आता चांगला नफा कमवत आहे. अशातच एका शेतकऱ्याने डाळिंबाची शेती करून त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलेले आहे. आज त्या शेतकऱ्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत . त्याचप्रमाणे डाळिंबाची पीक (Pomegranate Plantation) घेण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या हे देखील जाणून घेणार आहोत.

या शेतकऱ्याचे नाव संतोष धुमाळ असे आहे. ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात धुमाळवाडी येथे राहतात. डाळिंबाची शेती करून ते आज लाखोंची कमाई करत आहे. धुमाळवाडी हे गाव फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कारण या गावात सर्वाधिक फळांची शेती केली जाते. येथील बागायतदार हे त्यांच्या शेतीच्या जोरावर चांगले श्रीमंत झालेले आहेत.

धुमाळवाडीमध्ये अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. परंतु आता नवीन युवा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये फळबागेची लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे फळबाग करून ते वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. संतोष धुमाळ यांनी डोंगराळ भागामध्ये दोन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड (Pomegranate Plantation) केलेली आहे.

आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय शेतीच्या जोरावर पाण्याची कमतरता असतानाही त्यांनी दोन एकर शेतामध्ये ड्रीपच्या साहाय्याने पाण्याचे नियोजन केले. आणि डाळिंबाचे पीक घेतले. यावेळी त्यांनी उन्हापासून डाळिंबाचे संरक्षण देखील केले. यासाठी त्यांनी नेटचा वापर केला. अशा प्रकारे ते त्यांच्या शेतातून लाखो रुपये कमवत आहे. डाळिंबाची लागवड करताना जैविक शेतीचा देखील त्यांनी वापर केला आहे.

संतोष धुमाळ यांनी दोन एकर शेतीमध्ये 500 झाडांची लागवड केलेली आहे. या शेतातून त्यांना 8 ते 10 टन एवढे उत्पन्न होते. सरासरी 120 ते 125 रुपये डाळिंब प्रति किलो विकला जातो. अशा प्रकारे त्यांना 10 ते 12 लाख रुपये नफा मिळतो.