Saturday, March 25, 2023

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं निधन ; कोरोनासोबत हृदयविकाराचा होता त्रास

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यावर राहाट यांना इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसर्‍याच दिवशी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. देशातील सर्व नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.राहत इंदौरी यांच्या निधनानंतर साहित्य, कला, चित्रपट, संगीत,राजकारण या सर्वच क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. वास्तव परिस्थितीवर काव्यात्मक आणि कठोर भाष्य करण्यासाठी इंदौरी प्रसिद्ध होते.

वास्तविक, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राहत इंदोरी यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यानी  सोशल मीडियावर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. तसेच मला आणि माझ्या कुटूंबाला कोणीही कॉल करू नका असेही सांगितले. राहत इंदौरी याना यापूर्वी विविध प्रकारचे आजार होते. त्याना साखर आणि हृदयाची समस्या देखील होती.

- Advertisement -