पॉर्न पाहणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सकडून होऊ शकते तुमची रेकॉर्डिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । तुम्ही जर लैगिक भावना शमवण्यासाठी ऑनलाइन पॉर्न पाहत असाल तर सावधान. ऑनलाइन पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकते. सध्या ऑनलाइन पॉर्न पाहणाऱ्या युझर्सचं संगणक हॅक करुन त्यावर पाळत ठेवली जात आहे. तुमच्या नकळत या सर्व प्रकाराची रेकॉर्डिंग केली जाऊन तुम्हाला ब्लॅकमेलिंगला सामोरं जावं लागू शकत. ही बातमी वाचल्यानंतर तुम्हालाही तुमच्या प्रायव्हसीबाबत आता भीती वाटेल.

हॅकर्सकडून युझरची ऑनलाइन हालचाली (Activity) पाहण्यासाठी पीसी किंवा लॅपटॉपमध्ये एका मालवेअरचा वापर केला जातो. हॅकर्स मालवेअर इंस्टॉल झाल्यानंतर वेबकॅमच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करतात, ज्याद्वारे युझर्स पॉर्न पाहतात. यानंतर युझर्सला ब्लॅकमेल केलं जातं. पैसे न दिल्यास मेलमधील सर्व कॉन्टॅक्टला हा व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली जाते. सायबर गुन्हेगारी विश्वात याला सेक्सटॉर्शन सोप्या भाषेत व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग असं म्हटलं जातं.

अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगमध्ये पैशांची मागणी ही बिटकॉईनमध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे या मेलकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हॅकर्सने यावरही उपाय शोधला आहे. रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओची खात्री होण्यासाठी हॅकर काही माहिती शेअर करतात. याआधी अशा प्रकारचे ई-मेल्स इनबॉक्सच्या ऐवजी स्पॅम फोल्डरमध्ये जायचे. पण अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने हॅकर्सने ब्लॅकमेलिंगसाठी नवाच उपाय शोधला आहे. दरम्यान अँपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी या प्रकारांपासून वाचण्यासाठी एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. यामुळे लवकरच सेक्सटॉर्शनचे प्रकार रोखले जाऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment