पॉझिटिव्ह दर वाढला : सातारा जिल्ह्यात नवे 1हजार 4 कोरोना बाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 4 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 581 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 961 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 90 हजार 587 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 77 हजार 194 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 383 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 25 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 10 हजार 296 जणांचे नमुने घेण्यात आले.

गेल्या 24 तासात पॉझिटिव्ह दर 9. 74 इतका आला आहे त्यामुळे पॉझिटिव्हिटी दर घसरलेला होता. तो पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडाभरात पहिल्यांदाच एक हजारी पार गेल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

Leave a Comment