पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; अर्जांची अंतिम तारीख, पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घ्या

India Post recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Job Requirement| सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात (Indian Post Office) स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरीत पदासाठी अर्ज करा.

भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती

इंडिया पोस्ट ऑफिसच्या या भरतीअंतर्गत एकूण 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये या पदांची वाटणी करण्यात आली आहे. त्यानुसार, सेंट्रल रिजनमध्ये 1, एमएमएस चेन्नई येथे 15, साउथ रिजनमध्ये 4 आणि वेस्टर्न रिजनमध्ये 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि अटी

उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे लाइट आणि हेवी मोटर व्हेईकल चालवण्याचे वैध परवाना असावा.

किमान ३ वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे गरजेचे आहे.

अर्जदाराचे वय ५६ वर्षांच्या मर्यादेत असावे.

ही भरती ग्रुप C डेप्युटेशन/ऑब्झर्व्हेशन बेसवर केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही.

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-2 नुसार 19,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल. सरकारी नोकरी असल्यामुळे उमेदवारांना विविध भत्ते आणि अन्य सुविधा देखील मिळतील.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शेवटची तारीख

उमेदवारांनी आपला अर्ज 8 फेब्रुवारी 2025 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. अर्ज सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्विस, नंबर ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई – ६००००६ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.

दरम्यान, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टच्या या भरतीद्वारे उत्तम संधी मिळाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.