पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी मोठी बातमी! बचत खात्याशी संबंधित ‘हे’ नियम बदलले, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नवीन लोभसवाणी योजना आणत आहे. अनेक पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये ग्राहकांना सुरक्षित आणि गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. पोस्ट ऑफिसने आपल्या बचत खात्याशी संबंधित काही नियम आता बदलले आहेत. जर ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना तोटाही सहन करावा लागेल. वस्तुतः पोस्ट विभागाने पोस्ट ऑफिस खात्यात किमान शिल्लक मर्यादा 50 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढविली आहे. आता जर आपल्या खात्यात किमान 500 रुपये शिल्लक नसल्यास, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कामकाजी दिवशी पोस्ट ऑफिस दंड म्हणून 100 रुपये आकारेल. हे दरवर्षी केले जाईल.

बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे
या खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्यास हे खाते आपोआप बंद होईल. पोस्ट ऑफिस सध्या वैयक्तिक / संयुक्त बचत खात्यावर वर्षाकाठी चार टक्के व्याज देते.यासाठी बचत खात्यात किमान शिल्लक 500 रुपये असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जर आपण अद्यापही आपले खाते आधारशी जोडलेले नसेल तर उशिर न करता आधी हे काम करा जेणेकरुन आपण आपल्या शासकीय अनुदानाचा लाभ थेट आपल्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात घेऊ शकाल.

या पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा
रिकरिंग डिपॉझिट (RD)
मंथली इनकम स्कीम (MIS)
एफडी किंवा टाइम डिपॉझिट
पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF)
नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (NSC)
सीनियर सिटीजन सेविग्स स्कीम (SCSS)
किसान विकास पत्र (KVP)
सुकन्या समृद्धि खाते

अनुदानाच्या लाभासाठी आधार लिंक करावे लागेल
शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्याचा आधार घ्यावा लागेल. टपाल विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. टपाल खात्याने जारी केलेल्या या परिपत्रकात असे म्हटले आहे की लोक त्यांच्या पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) घेऊ शकतात. आधार जोडणारा कॉलम देखील समाविष्ट आहे. हा कॉलम खाते उघडण्याच्या अर्जात किंवा परचेज ऑफ सर्टिफिकेट फॉर्म मध्ये दिसून येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.