PM मोदींविरोधातील पोस्टरबाजी पडली महागात; १५ जण अटकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या मोठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे मात्र लसीचा तुटवडा जाणवतो आहे यावरूनच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टरबाजी करणे काहीजणांना चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून 15 जणांना अटक केली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पोस्टरमध्ये असं म्हटलं होतं की ‘मोदी जी हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश मे क्यू भेज दिया’ म्हणजेच आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली? असा सवाल या पोस्टर मधून केला होता.

याप्रकरणी काही तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या गुरुवारी ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले या प्रकरणी भादवि कलम १88 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विविध जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आणखी काही एफआयआर दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जातेय. जर या प्रकरणी आणखी काही तक्रारी दाखल झाल्या तर सध्या प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे . कुणाच्या पाठिंब्याने किंवा कोणाच्या सांगण्यावरून विविध शहरात ही पोस्टरबाजी करण्यात आली याबाबत तपास सुरू आहे. त्यानंतर योग्य ही कारवाई केली जाण्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यक्तींना हे पोस्टर लावण्यासाठी पाचशे रुपये देण्यात आले होते अशी माहिती दिली आहे शहाद्रा परिसरातून पोलिसांना काही जण पोस्टर चिटकवताणाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. त्यानुसार ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पश्चिम दिल्ली तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि बाह्य दिल्लीत आणखी तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. दिल्लीच्या मध्यभागी असणाऱ्या परिसरातून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तिथं दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दोन एफायार रोहिणी मध्ये दाखल करण्यात आले असून तिथे दोघांना अटक करण्यात आलीये. पूर्व दिल्लीत एक एफआयआर नोंदवण्यात आली असून तिथे चौघांना अटक करण्यात आली आहे. तर द्वारका परिसरात एक एफआयआर दाखल करण्यात आले असून तिथं दोघांना अटक करण्यात आली आहे

Leave a Comment