कॉंग्रेस सोबत आघाडी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसची मोठी हानी केली. याच निवडणुकीआधी कॉंग्रेसने वंचितला महाआघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नेमकी बोलणी कोणत्या मुद्द्यावर फिस्कटली याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उघड भाष्य्य केले आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित सलग ३ वेळा पराभूत झालेल्या १२ जागा आम्ही त्यांच्याकडे मागितल्या होत्या. मात्र कॉंग्रेसने त्या जागा आम्हाला दिल्या नाहीत. आता कॉंग्रेस आम्हाला भाजपची बी टीम म्हणून हिणवू लागले आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे. कॉंग्रेसच्या या आरोपामुळे आमच्या वंचित आघाडी मधील कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्या हे पुराव्या निशी सिद्ध करावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

कॉंग्रेस आम्हाला विधानसभा निवडणुकीला युती करण्यासाठी ऑफर देत असली तरी आम्ही त्यांच्या आघाडीत सामील व्हायचे का याबद्दल विचार करू. आमच्या बैठकांमध्ये या मुद्द्याचे मंथन करून मगच अंतिम निर्णय घेवू मात्र आम्ही आत्ताच आमचे पत्ते उघड करणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Leave a Comment