राज्य आणि केंद्र सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी प्लॅन नाही – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे प्लॅन नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अर्थव्यवस्थेसंबंधी योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी त्यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही तोपर्यंत कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. कदाचित त्यांच्याकडे योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो. पण एकंदरीत लोकं काय निर्णय घेतला पाहिजे सांगत आहेत. पण शासन काय निर्णय घ्यायचा हे ठरवत नाहीये. दुर्दैवाने सरकार फक्त आदेश काढत आहेत”. मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं दिसत आहे, करोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment