व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पहाटेच्या शपथविधी वरून आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, अजित पवारांनी….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 विधानसभा निवडणुकीनंतरच्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी बाबतचे गूढ अजूनही कायम आहे. दोन्ही नेते याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार देत असतात. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र पहाटेच्या शपथविधी वरून मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) केसेस काढून घेण्यासाठी पहाटेचा शपथविधी केला असं त्यांनी म्हंटल आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यावर आता अजितदादा काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

बदलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अजित पवारांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा राष्ट्रवादी मध्ये गेले असं त्यांनी म्हंटल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा सरड्यासारखा रंग बदलणारा पक्ष आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडीचा आणि वंचित बहुजन आघाडीचा काहीही संबंध नाही, समझौता सुद्धा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच जाहीर केलं आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत समझौता करु शकत नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचा आणि आमचा काहीही संबंध नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.