भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या कराड शहराध्यक्षपदी प्रकाश जाधव

कराड | अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या कराड शहराध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्ष संदिप जगताप यांनी या निवडीचे पत्र दिले. राळेगणसिध्दी येथे झालेल्या बैठकीत आण्णा हजारे यांनी संघटनेच्या पुनर्बाधणी करणेबाबत सर्व जिल्हाध्यक्षांना सुचना देण्यात आल्या होत्या.

सातारा येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या निवडी तर कराड शहराध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष तात्या सावंत, चांदभाई अत्तार, सर्जेराव पाटील, चंद्रशेखर सोनार, हेमंत कदम, सुनिल शिंदे, संतोष यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जगताप म्हणाले, जिल्ह्यातील पाच हजार सदस्य करण्याचे उद्दिष्ट असून अण्णा हजारे यांचे मार्गदर्शनाखाली ते येत्या तीन महिन्यात करु असा विश्वास यावेळी व्यक्त केला. प्रकाश जाधव यांनी यापूर्वी कराड शहरांमध्ये अतिशय चांगले काम केले असल्याने त्यांची निवड करण्यात येत आहे.

निवडीनंतर प्रकाश जाधव म्हणाले, अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन व जिल्हाध्यक्ष संदिप जगताप यांची साथ मिळाल्याने या पुर्वीही संघटनावाढीसाठी कार्य केले आहे. याच कामाचा अनुभव पाठीशी असल्याने यापुढेही शहरातील गरजूंना शासन दरबारी मदत करण्याचे काम निश्चित केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.