गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवसृष्टी निर्माण करणार – प्रमोद सावंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात प्रमोद सावंत यांनी 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.त्यानंतर प्रमोद सावंत यांनी गोव्यातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. मुख्यमंत्री पदाची सूत्री हाती घेतल्यानंतर त्यांनी “गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवसृष्टीची निर्मिती करणार असल्याचे महत्वाचे विधान केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आज मराठा सेवा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सावंत यांनी मराठा सेवा संघाला एक महत्वाचे आश्वासन दिले.

गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवसृष्टी निर्माण व्हावी अशी गोव्यातील जनतेशी माझीही इच्छा आहे. मराठा सेवा संघाकडूनही या ठिकाणी शिवसृष्टी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी नक्की शिवसृष्टी उभारली जाईल. त्याचप्रमाने येथील किल्ल्यांचं पीपीपी तत्वावर संवर्धनही केले जाईल, असेही यावेळी सावंत यांनी सांगितले.

Leave a Comment