प्रमोद सावंत यांचा आज शपथविधी; मोदींसह अनेक दिग्गज राहणार उपस्थित

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची वर्णी लागली असून आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन भाजपमध्येच चढाओढ पाहायला मिळाली होती. याआधीच विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील स्पर्धाही अनेकदा चर्चिली गेलेलीय. अशातच निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत राणेंनी मतदारांचे आभार मानताना जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो कुठेच दिसून आला नव्हता. मात्र, प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्यानं अखेर मुख्यमंत्रीपदी सुरू असलेली रस्सीखेच थांबली.

प्रमोद सावंत दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, अलिक्सो रेजिनाल्ड (अपक्ष), गोविंद गावडे, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर (मगोपा), जेनफर मोन्सेरात आणि रवी नाईक हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. गोव्यात ४० जागांपैकी भाजपने 20 जागा जिंकलेल्या आहेत. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि एंटोनियो वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलं आहे. तसेच एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही भाजपला पाठिंबा दिलाय.