अगोदर लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?”, चिदंबरमांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावरून आता काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्धअसा सवाल विचारला आहे. पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

“एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?” असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच “पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी 21 दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?” असं देखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला आहे. “पोकळ अभिमान आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे” असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी देखील पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी” आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

Leave a Comment