रस्त्यात तडफडणाऱ्या प्रेग्नंट बायकोसाठी नवऱ्याची केविलवाणी धडपड; अखेर चालत्या गाडीसमोर गेला अन्…

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही मन हेलावून टाकणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका प्रेग्नंट महिलेचा आहे. या महिलेला अचानक रस्त्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे ती रस्त्यावर तडफडत होती. सुदैवाने त्यावेळी तिचा नवरा तिच्यासोबत होता. या महिलेला मदत मिळावी म्हणून या महिलेचा नवरा केविलवाणी धडपड करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एक प्रेग्नंट महिला आणि तिचा नवरा रस्त्यावरून चालत आहेत. अचानक या महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू होतात. या प्रसूती वेदना एवढ्या जोरात आहेत कि ती उभीच राहू शकत नाही. ती तशाच अवस्थेमध्ये रस्त्यात बसते. जशा बायकोला कळा सुरू होतात, तेव्हा तिला मदत करण्यासाठी नवऱ्याची धडपड सुरू होते. यानंतर तो आपल्या खिशातील मोबाईल काढून फोन लावताना दिसत आहे. तसेच तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र सुरुवातीला कुणीही त्यांची मदत करण्यासाठी तयार होत नाही.

यानंतर या महिलेचा पती रस्त्याच्या मधोमध जातो आणि एका भरधाव गाडीसमोर रस्त्यावर आपले गुडघे टेकवून बसतो. हात जोडून मदतीसाठी विनवणी करतो. या व्यक्तीला अचानक समोर पाहून काळ्या रंगाची कार थांबते. त्या कारमधून एक व्यक्ती बाहेर येते. प्रेग्नंट महिलेला रस्त्यावर पाहताच ती व्यक्ती गाडीतून उतरते आणि तिच्या दिशेने धावते. यानंतर या महिलेचा नवरा आणि गाडीमधील व्यक्ती दोघंही या महिलेला उचलतात आणि कारमध्ये बसवायला नेतात. याचवेळी पलीकडच्या बाजूकडून दुचाकीवर जाणारा एक व्यक्तीही त्यांच्या मदतीसाठी धावून येते. hassbiy.ya_allah नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.